Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डेंगी पेशंटची माहिती लपवू नका

0
0
ग्रामीण असो की शहरी भागातील ग्रामपंचायत, नगरपालिकांनी घराघरांमध्ये तापाच्या पेशंटचा शोध घेताना डेंगीच्या पेशंटची माहिती न लपविता आरोग्य विभागाला द्यावी, असे आदेश आरोग्य खात्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रिंग रोडला अखेर मिळाला मुहूर्त

0
0
गेली सात वर्षे केवळ कागदोपत्रीच असलेल्या शहराभोवतीच्या प्रस्तावित रिंग रोडच्या कामाला अखेर मुहूर्त लाभला असून १७० किलोमीटर लांबीच्या या रिंग रोडच्या सर्वेक्षणाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे.

‘पीएमपी’ची भाडेवाढ

0
0
पीएमपीच्या तिकीटदरांमध्ये सरासरी २० टक्के वाढ करण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) संचालक मंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला किमान ५ ते कमाल २५ रुपयांपर्यंत चाट बसणार आहे.

पवारांनी केली शिवसेनेची गोची

0
0
विधिमंडळात भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याची भेट घेतलेली नाही, असा खुलासा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी करून काही तास उलटतात, तोच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी, पडद्यामागे शिवसेनेच्या वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे संकेत दिलेत.

विद्यार्थ्यांच्या बसला अपघात

0
0
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचा ब्रेक निकामी झाल्याने ती फुटपाथवरील विजेच्या खांबाला धडकल्याची घटना माळवाडीतील साने गुरुजी हॉस्पिटलसमोर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे उत्तम

0
0
‘उदयोन्मुख कंपन्यांसाठी पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. फायनान्शिल टेक्नोलॉजीज आणि पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात पुणे प्रथम क्रमांकावर आहे. पुणे शहरात असलेली गुणवत्ता, उत्तम इंजिनीअरिंग कॉलेजे, आयटी आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातील उद्योग यांमुळे पुणे ‘स्टार्ट अप’ कंपन्यांसाठी उत्तम शहर आहे,’ अशी माहिती ‘थिंक पुणे’ या अहवालातून समोर आली आहे.

प्रकल्प पाहणी, की नुसतीच सहल?

0
0
शहरातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय स्थायी समितीच्या सदस्यांनी नियोजित दौऱ्याला मध्येच कात्री लावली अन् संभाव्य ठिकाणांची पाहणी न करताच राज्यातील पर्यटनस्थळांच्या सहलीचा मार्ग धरला.

एसटीपी प्लांटच्या टाकीत पडून दोघांचा मृत्यू

0
0
सोसायटीमधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची टाकी साफ करत असताना, विषारी वायुच्या त्रासामुळे चक्कर आल्याने चारजण टाकीत पडले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये अग्निशामकदलाच्या जवानाचा समावेश आहे.

हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

0
0
नियमाचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित वाहनचालकाकडूनच हेल्मेट न घातल्याबद्दल आकारण्यात येणारा दंड गेल्या दोन दिवसांत हेल्मेट न घातलेल्या सर्वच वाहनचालकांकडून आकारण्यात आला.

स्वच्छता करा, डेंगी हटवा

0
0
पुण्यासह राज्यातील डेंगीचा वाढता प्रादुर्भाव पाहता डेंगी निर्मूलनासाठी स्वच्छतेवर भर देण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांनी आरोग्य खात्याच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांना दिले.

दिलेला शब्द पाळा; ‘एलबीटी’तून सुटका करा

0
0
एलबीटीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पूर्वीच्या सरकारने विलंब लावल्याने व्यापारी वर्गाची नाराजी ओढवली. आता भाजपने निवडणुकीपूर्वी एलबीटी हटविण्यासंदर्भात व्यापारी संघटनांना दिलेले लेखी आश्वासन पाळून व्यापारी वर्गाची एलबीटीतून सुटका करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सत्ताधाऱ्यांना दिला.

राज्यात स्थैर्य राहावे एवढीच इच्छा

0
0
भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादीतील मतभेद आणि शिवसेना-भाजपची जवळीक, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने भाजपच्या पाठिंब्यावर सावध भूमिका घेतली आहे. आम्ही भाजपच्या विचारसरणीला पाठिंबा देत नाही, मात्र राज्यात स्थैर्य राहावे, एवढीच भाजपला पाठिंबा देण्यामागे आमची भूमिका आहे, असा पवित्रा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात घेतला.

ग्राहकांच्या आवाजाला नाही उरला वाली

0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केलेल्या दरवाढीविरोधात प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असला, तरी दरवाढीला मान्यता देणाऱ्या जिल्हा परिवहन प्राधिकरणावर (डीटीए) ग्राहकांचा प्रतिनिधीच नसल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.

कीर्तिकरांना हटवून डॉ. अमोल कोल्हेंची नियुक्ती

0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पुण्यासह सातारा आणि सांगलीमध्ये नव्या संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली आहे.

शिक्षण क्षेत्रात बदल?

0
0
शिक्षण क्षेत्राची स्थिती कशी आहे, त्यात कोणते बदल अपेक्षित आहेत, ते कसे करता येतील, याची माहिती कळवण्याचे आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कात्रज-देहूरोड प्रवास जीवघेणा

0
0
पायाभूत सुविधांचा अभाव, रस्ता रुंदीकरणाचा रेंगाळलेला प्रकल्प आणि बेशिस्त वाहतूक अशा परिस्थितीत कात्रज-देहूरोड बायपास रस्ता जीवघेणा ठरतो आहे. पुणे बेंगळुरू हायवेमुळे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी झाला असला, तरी हायवेवरील अपघातांची संख्या वाढत आहे.

हवामान विभाग ‘संवाद’ वाढवणार

0
0
अतिवृष्टीचा इशारा आम्ही दिला होता, पण संबंधित राज्य सरकारने, अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. वेधशाळेचा इशाराच त्यांना कळालाच नाही…अशा तक्रारी यापुढे ऐकायला मिळणार नाहीत. प्रशासकीय अधिकारीच नव्हे तर सर्वसामान्यांनाही हवामानाचा अंदाज सहजसोप्या शब्दात मिळावा, यासाठी केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयातर्फे हवामान अंदाजाचा नवीन शब्दसंग्रह करण्याचे काम सध्या सुरू आहे.

‘एकदाच्या चौकशा करून टाकाच’

0
0
‘नव्या सरकारला कोणाच्या चौकशा करायच्या आहेत, त्या एकदाच्या करून टाकाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी दिले. काही विषयांचा निवडणुकीत प्रचार करण्यात आला, प्रत्यक्षात त्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

पुण्यात ३४ हजार शस्त्रपरवाने!

0
0
शांत आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात १९३२ पासून तब्बल ३४ हजार नागरिकांनी शस्त्र परवाने घेतले आहेत. पुणे आयुक्तालय सुरू होण्यापूर्वी संस्था, बँकांच्या नावानेच शस्त्र परवाना देण्यात येत असे.

सायकल चालवा, आरोग्य, निसर्गाचा धोका रोखा

0
0
‘सायकल चालवा, आरोग्य आणि निसर्गाचा धोका रोखा’ असा संदेश देत ‘टीम क्रँक’च्या पाच सदस्यांनी चिंचवड ते गोवा असा सुमारे पाचशे किलोमीटरचा सायकल प्रवास नुकताच पूर्ण केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images