More Channels
Showcase
Articles on this Page
- 11/28/11--14:19: _कॅम्पमधील चर्च आगीत...
- 11/28/11--14:19: _पुणे मॅरेथॉनसाठी नि...
- 11/28/11--14:19: _निवडणूक प्रशिक्षण.....
- 11/28/11--14:19: _पोलिस कर्तव्य मेळाव...
- 11/28/11--14:19: _धनुष्यबाण घ्या किंव...
- 11/28/11--14:19: _तिकिटासाठी ऐकवा 'मे...
- 11/28/11--14:19: _सरकारला थप्पड मतपेट...
- 11/28/11--14:19: _लक्ष्मी रोडवर 'वॉकि...
- 11/28/11--14:19: _'एसआरए' विकसकाला चा...
- 11/28/11--14:19: _ऐन थंडीत फुटला घाम...
- 12/10/11--14:36: _तिकीट वाटपात वरिष्ठ...
- 12/10/11--14:36: _उस ५० लाख टनाने घटला
- 12/10/11--14:36: _पुण्याचे प्रश्न उचल...
- 12/10/11--14:36: _ससूनमध्ये अग्नीशामक...
- 12/10/11--14:36: _आज नगर परिषद निवडणूक
- 12/10/11--14:36: _लोणावळा,तळेगाव,आळंद...
- 12/10/11--14:36: _देहविक्रय करणा-या म...
- 12/10/11--14:36: _'सहवीज'मधून डिसेंबर...
- 12/10/11--14:36: _सरकारी हॉस्पिटलांमध...
- 12/10/11--14:36: _अग्निशमन यंत्रणेची ...
Channel Description:
कॅम्प परिसरातील ब्रिटिशकालीन हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च सोमवारी सकाळी आगीत जळून खाक झाले. शॉर्ट-सकिर्टमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अर्थात, आगीमागे घातपाताची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांनी गेल्या पाच वर्षांपासूनचा हिशेब दिला नसल्याने त्यांना पुणे महापालिकेने मंजूर केलेले गेल्या वषीर्चे साडेचौदा लाख रुपये आणि या वषीर्साठी २५ लाख रुपये देण्यात येऊ नयेत, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.
महापालिका सभागृहात पुढील वर्षी महिलांचा आवाज पुरुष नगरसेवकांच्या बरोबरीने घुमणार असल्याने, त्या दृष्टीने विविध राजकीय पक्षांनी महिलांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांचे व्यावसायिक नैपुण्य, गुणवत्ता, कौशल्य, कार्यक्षमता यांचा दर्जा वाढविण्यासाठी दरवषीर् आयोजित करण्यात येणारा पोलिस कर्तव्य मेळावा १ ते ४ डिसेंबरच्या दरम्यान नाशिक येथे होणार आहे.
'शिवसेनेचे कोणतेही उमेदवार यापुढे फक्त धनुष्यबाणाच्या चिन्हावरच लढतील. परस्पर आघाडी करण्याचे प्रकार यापुढे चालणार नाहीत; अन्यथा तसे करणारे शिवसेनेत नसतील,' अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आसूड ओढला.
राजकारणात नशीब आजमावण्यासाठी काँगेसमध्ये आतापर्यंत नातीगोती महत्त्वाची होती; पण आता 'काम दाखवा आणि पद मिळवा' हे धोरण आले आहे.
'केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सेनाप्रमुखांनी जाहीर निषेध केला. व्यक्तिगत हल्ले करण्याची परंपरा शिवसेना महाराष्ट्रात कधीही रुजू देणार नाही; पण महागाईच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी सत्ताधारी तिचे समर्थन करीत असतील, तर या सरकारला मतपेटीतून थप्पड मारली पाहिजे,' असे आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.
लक्ष्मी रोडवर पादचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला 'वॉकिंगमध्य'चा उपक्रम कायमस्वरुपी राबवण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सोमवारी काढले.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे (एसआरए) शहरात योजना राबविताना संबंधित विकसकाला डेव्हलपमेंट चाजेर्स आकारण्याचा नियम करावा; तसेच त्याचा समावेश महापालिकेच्या विकास नियमावलीमध्ये करण्याची सूचना काँगेसचे गटनेते आबा बागूल यांनी केली आहे.
ढगाळ हवा आणि किमान तापमानासह आर्दतेमध्ये झालेली मोठी वाढ यामुळे ऐन थंडीच्या दिवसांत घामाघूम होण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. घामाच्या धारांबरोबरच राज्याच्या काही भागांत पुढील ३६ तासांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताही वेधशाळेने वर्तवली आहे.
महापालिकेच्या येत्या निवडणुकीत उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार शहर स्तरावरील निवड समितीला असून वरिष्ठ नेते तिकीट वाटपात हस्तक्षेप करणार नाहीत, अशी हमी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणिस विनोद तावडे यांनी दिली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात पडलेल्या कमी पावसाचा फटका उसाच्या उत्पादनाला बसला असून मागील वषीर्च्या तुलनेत यंदाच्या वषीर् ५० लाख मेट्रीक टन उसाचे उत्पादन घटले आहे.
राज्य सरकारमुळेच पुण्याचा विकास आराखडा रखडला असून, तो तातडीने मंजूर होण्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सादर करणार असल्याचे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
हॉस्पिटलमध्ये लागलेली आग विझविण्याबरोबरच पेशंट्सच्या सुरक्षेचे उपाय म्हणून पुरेशी अग्नीशामक यंत्रणाच ससून हॉस्पिटलमध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड वगळता अन्य नऊ नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज (रविवारी) मतदान होत असून त्यासाठी निवडणूक प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. संवेदनशील मतदान केंदांवर जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
लोणावळा, तळेगाव आणि आळंदी नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून, या तिन्ही ठिकाणच्या २४२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य रविवारी (११ डिसेंबर) मतपेटीत बंद होणार आहे.
देहविक्रय करणाऱ्या एका महिलेची त्या चक्रव्युहातून सुटका होते..., नगर जिल्ह्यातील 'स्नेहालय' संस्थेत तिला केवळ आसरा मिळत नाही, तर पोटापाण्यासाठी मदतही मिळते..., संस्थेचे ऋण फेडण्यासाठी हीच महिला तिची पुण्यातील जागा संस्थेच्या नावावर करते...
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी उभारलेल्या सहवीज निमिर्ती प्रकल्पांमधून येत्या डिसेंबरअखेर ८५० मेगावॉट वीज मिळणार आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना भारनियमनातून दिलासा मिळणार आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित सरकारी हॉस्पिटलांमध्ये अग्नीशामक यंत्रणाच पुरेशी नसल्याचे स्पष्ट झाल्याने राज्यातील वीस हॉस्पिटलांच्या 'फायर सेफ्टी'चे ऑडिट क रण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतला आहे.
पुणे शहर आणि परिसरातील हॉस्पिटलांमधील अग्निशमन यंत्रणेच्या तयारीबाबत अग्निशामक दलाकडून अनेकदा अचानक पाहणी करण्यात येते. हॉस्पिटलांमधील अग्निशमन यंत्रणा समाधानकारक आहे.